कोरोनामुळे बेस्ट `स्लो ट्रक’वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 April 2021

कोरोनामुळे बेस्ट `स्लो ट्रक’वर



मुंबई - वाढत्या रुग्ण संख्येमुळे 15 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु रुग्ण संख्या व मृत्यूचा वाढता आकडा लक्षात घेता 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.मात्र 15 एप्रिलपासून कडक निर्बंध लागू झाल्यापासून बेस्ट प्रवासी व उत्पन्नात घट झाल्याचे समोर येत आहे. 15 ते 22 एप्रिलपर्यंत फक्त 7 कोटी 33 लाख 15 हजार 365 प्रवाशांनी प्रवास केला असून 8 कोटी 10 लाख 50 हजार 765 रुपये उत्पन्न मिळाल्याने बेस्ट उपक्रम `स्लो ट्रकवर’आल्याचे दिसून येते. आर्थिक कोंडीमुळे बेस्ट उपक्रमांची आधीच नाकाबंदी झाली आहे. त्यात गेल्या वर्षी कोरोनाचे संकट ओढावले आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी बेस्ट बस बंद करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS