तरूणाईला दिलासा. 18 वर्षावरील लसीकरणाला सुरूवात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2021

तरूणाईला दिलासा. 18 वर्षावरील लसीकरणाला सुरूवात



मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची सुरूवात आज मुंबईतील पाच लसीकरण केंद्रांवर सकाळपासून सुरूवात झाली. काेविन अॅपवर नाेंदणी केलेल्या नागरिकांचेच आज लसीकरण करण्यात आले. त्यामुळे केंद्रामवर शिस्तबध्द लसीकरण झाले. आॅनलाईन रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न करणार्या नागरिकांना आजही अडचणी आल्याने त्यांची घाेर निराशा झाली. मात्र लसीकरणाने तरूणाईला दिलासा मिळाला.

१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईतील नायर, घाटकोपर येथील राजावाडी, जुहू येथील कूपर रुग्णालय आणि बिकेसी जम्बो कोविड सेंटर, सेव्हन हिल्स या पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. त्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली हाेती. या लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करणे आवश्यक केल्यामुळे प्रत्येक केंद्रांवर दाेनशे नागरिकांचेच लसीकरण करण्यात आले.

कुपर रुग्णालयात फक्त २०० डोस इतकेच लसीकरण करण्यात आले. सुरूवातीला आलेल्या 200 नागरिकांनाच केंद्रांवर थांबण्याच्या सुचना देण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे नाेंदणी न करता आलेल्या नागरिकांची घाेर निराशा झाली. ज्यांना मॅसेज आले त्यांनाच लस दिली जाईल अशी घाेषणा केंद्रावर करण्यात आली, त्यामुळे नागरिकांना आल्या पावली परतावे लागले.

सेव्हन हिल्स रुग्णालयातही आज सकाळी लसीकरण सुरू झाले. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची या केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलिसांनी आणि रुग्णालय प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ज्यांनी कोव्हीन ऍपवर नोंदणी केलेल्या 200 नागरिकांनाच थांबवण्यात आले त्यामुळे नागरीकांची येथेही निराशा झाली. संध्याकाळी 6 पर्यंत लसीकरण सुरू हाेते. सकाळपासूनच लसीकरण केंद्रावर झालेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते. घाटकाेपर येथील राजावाडी आणि जुहू येथील कुपर रुग्णालयात लसीकरणासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी झाल्याचे चित्र हाेते.

महापाैरांची बीकेसीला भेट -
बीकेसी लसीकरण केंद्राला आज सकाळी महापौर किशोरी पेडणेकर आणि खासदार अरविंद सावंत यांनी भेट दिली. यावेळी लसीकणासाठी आलेल्या नागरीकांची त्यांनी विचारपूस केली. तसेच लसींच्या तुटवड्याबाबत त्यांना स्थानिक आराेग्य अधिकार्यांकडून माहिती जाणून घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad