भारतासह विकसनशील देशांना कोरोना लसींचा फॉर्म्युला देऊ नका - बिल गेटस् - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2021

भारतासह विकसनशील देशांना कोरोना लसींचा फॉर्म्युला देऊ नका - बिल गेटस्



वॉशिंग्टन : जगात कोरोनाचे संकट वाढत असतानाच जगातील श्रीमंत देशांनी लसींचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे विकसनशील देश लसींसाठी तळमळत आहेत. हे सुरू असतानाच जगातील सर्वात धनाढय़ उद्योगपती व मॉयक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक बिल गेटस् यांनी `कोरोना लसींचा फॉर्म्युला भारतासह विकसनशील देशांना दिला जाऊ नये’, असे भेदभावजनक वक्तव्य केले. यामुळे जगात संताप व्यक्त होत आहे.

`स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांना कोरोना लसीबाबत स्वामित्व अधिकाराबाबत प्रश्न विचारला. लसी बनवण्यासंदर्भातील माहितीवर असणारा स्वामित्व अधिकार रद्द करुन जगभरातील अनेक देशांबरोबर ती माहिती शेअर करावी का?, असे केल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये लसींचा पुरवठा वेगाने होईल असे वाटते का?, असा प्रश्न गेट्स यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना गेट्स यांनी, `नाही’ एवढचं म्हटल.

गेट्स यांनी भारताचा उल्लेख करताना सांगितले की, जगामध्ये लसनिर्मिती करणार्या अनेक संस्था आहेत. सर्वचजण लसीच्या सुरक्षेसंदर्भात फार गंभीर आहेत. तरीही कोरोना लसीचा फॉर्म्युला इतर देशांना सांगितला जाऊ नये असे मला वाटते. अमेरिकेतील जॉन्सन ऍण्ड जॉन्सनचे निर्मिती केंद्र आणि भारतातील लसनिर्मिती केंद्रात फरक आहे. आपण लस आपल्या पैशांनी आणि तज्ञांच्या मदतीने निर्माण करतो, असे गेट्स म्हणाले. म्हणजेच लस बनवणे हे फार जबाबदारीचे काम असून विकसनशील देशांकडून ते जबाबदारीने पार पाडले जाईल की नाही यासंदर्भात गेट्स यांनी आपल्या वक्तव्यातून शंका उपस्थित केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad