कोरोना रुग्णांची संख्या घटतेय, पण देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2021

कोरोना रुग्णांची संख्या घटतेय, पण देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात



नवी दिल्लीः देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालायने आज पत्रकार परिषद घेत करोनाने निर्माण झालेल्या राज्यनिहाय स्थितीची माहिती दिली. देशातील १२ राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ७ राज्यांमध्ये ५० हजारा ते १ लाखादरम्यान अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आरती आहुजा यांनी दिली.

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हरयाणा आणि बिहारमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. २४ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये १५ टक्क्यांहून अधिक पॉझिव्हिटी दर आहे. ५ ते १५ टक्के पॉझिटिव्हिटी दर हा ९ राज्यांमध्ये आहे. तर ५ टक्क्यांहून कमी पॉझिटिव्हिटी दर हा ३ राज्यांमध्ये आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगण आणि झारखंड आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आधी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. पण आता या राज्यांमध्ये हळू हळू करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर पंजाब, जम्मू आणि काश्मर, आसाम, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये करोनाच्या रोज नवीन रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहेत. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, हरयाणा, ओडिशा आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही करोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी सांगितलं.

देशात १८ ते ४४ वर्षांवरील लसीकरण मोहीमेत आतापर्यंत ११.८१ लाख नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर देशात एकूण १६.५० कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad