लता मंगेशकर यांनी केले वांद्रे 'जंबो कोविड' रुग्णालयाच्या कामाचे कौतुक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2021

लता मंगेशकर यांनी केले वांद्रे 'जंबो कोविड' रुग्णालयाच्या कामाचे कौतुकमुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील 'जंबो कोविड' रुग्णालय येथे गेले वर्षभर अहोरात्र कोविड रुग्णांची सेवा केली जात आहे. याची दखल आता भारतरत्न लता मंगेशकर यांनी घेतली असून त्यांनी शाबासकीची थाप देणारे एक पत्रच जंबो कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश डेरे यांना पाठविले आहे. विशेष म्हणजे लतादीदींनी हे पत्र आपल्या हस्ताक्षरात लिहून पाठविले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ईश्वर तुम्हाला सदा सुखी ठेवो, अशी मी मंगल कामना करते...". लतादीदींच्या कौतुक भरल्या व शाबासकीची थाप देणाऱ्या या पत्रामुळे आम्हा सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने रुग्णसेवा करण्याचे बळ मिळाले आहे, अशी नम्र भावना डॉक्टर डेरे यांनी यानिमित्ताने आवर्जून व्यक्त करत भारतरत्न लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १८ मे २०२० रोजी 'एम.एम.आर.डी.ए.'ने उभारलेल्या या कोविड समर्पित रुग्णालयाचे बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत या रुग्णालयात अव्याहतपणे कोविड बाधितांची सेवा व त्यांच्यावर आवश्यक ते औषधोपचार केले जात आहेत. गेल्या वर्षभरात या रुग्णालयात साधारणपणे २२ हजार इतक्या कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर याच ठिकाणी कार्यरत असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रात नियमितपणे लसीकरण करण्यात येत असून आजवर सुमारे २ लाख ५० हजार लशीच्या मात्रा याठिकाणी देण्यात आल्या आहेत.

अत्यंत अल्पावधीत उभारण्यात आलेल्या या महानगरपालिकेच्या रुग्णालयात तब्बल २ हजार २०८ खाटा आहेत. यामध्ये ८६८ ऑक्सीजन बेड असून १२० अतिदक्षता बेडचा समावेश आहे. तसेच ६७ रुग्णशय्यांना 'व्हेंटिलेटर सपोर्ट' देखील आहे. या व्यतिरिक्त ज्या कोविड बाधित रुग्णांना नियमितपणे डायलिसिसची गरज असते, अशा रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्यासाठी १२ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी २४ तास व आठवड्याचे सातही दिवस साधारणपणे ३७८ डॉक्टर्स, ३९९ परिचारिका व ५१३ वैद्यकीय कर्मचारी (वॉर्डबॉय) कार्यरत आहेत. तसेच रुग्णालयाच्या इतर व्यवस्थेसाठी २०० कर्मचारी कार्यरत असून १५२ सुरक्षारक्षक देखील सुरक्षेच्या दृष्टीने तैनात आहेत. तसेच या रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकाही तैनात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad