करोनाबाबत गाफीलपणा नडला; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची केंद्रावर कठोर टीका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2021

करोनाबाबत गाफीलपणा नडला; माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची केंद्रावर कठोर टीका



नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यानेच करोनाने देशात कहर केला आहे. दररोजची प्रचंड रुग्णसंख्या सरकारी यंत्रणांचा करोनाबाबतचा बेजबाबदारपणाची साक्ष देत आहेत. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव याचा परिपाक म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठं नुकसान केलं असल्याची घणाघाती टीका माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारवर केली.

करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहीले असते तर त्यांनी तसे नियोजन केले असते. सरकारमधील कोणी जर जगाकडे लक्ष दिले असते की इतरत्र करोनाची काय परिस्थी आहे तर कदाचित भारतात इतकी वाईट परिस्थिती ओढवली नसती, असे राजन यांनी म्हटलं आहे. उदाहरण द्यायचे तर ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असे रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. इथं एक लक्षात घ्यायला हवं की केंद्रातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी भारताने करोनाविरोधातील लढाई जिंकली, करोनाला भारताने हरवलं, अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वीच केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात मार्च आणि एप्रिल महिन्यात करोनाने पुन्हा शिरकाव केला, असे राजन यांनी नमूद केलं आहे.

पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला.गेल्या वर्षी पाहिल्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या एका लाखांवर गेली नव्हती. मात्र यावेळी त्यात तीनपटीने वाढ झाली आहे. सलग १३ दिवस देशातील दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी ३ लाखांच्या पुढे आहे. त्यावरदेखील राजन यांनी टीका केली आहे. तसेच देशात लसीकरण मोहिमेतील गोंधळ देखील करोनाची साथ वाढण्यास कारणीभूत असल्याचे राजन यांनी म्हटलं आहे. लसीकरण मोहिमेत निर्माण झालेल्या अडथळ्यांनी करोनाची दुसरी लाट आणखी घातक बनली असल्याचे राजन यांनी म्हटलं आहे.

आजच्या घडीला भारतात करोनाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेते ३४०० भारतीयांचा मृत्यू झाला आहे. करोना संकटाची वाढती तीव्रता पाहता अनेक औद्योगिक संघटनानी देशव्यापी लॉकडाऊनची मागणी सरकारकडे केली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रमुख राज्यांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. राज्यांना ऑक्सिजन, रेमडेसीव्हीर औषधे, व्हेंटीलेटर्स, बेड यासारख्या वैधकीय साधन सामुग्रीचा प्रचंड तुटवडा भासू लागला. ऑक्सिजनअभावी शेकडो रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना पाच राज्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad