मुंबई - कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंधन दरवाढी विरोधात शनिवारी गोरेगाव येथे भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. जमावबंदी असल्याने आंदोलन थांबवण्याच्या सूचना देऊनही आंदोलन सुरुच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली.
पेट्रोल दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसने गोरेगाव येथे शनिवारी आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असल्याने पोलिसांनी आंदोलन थांबवायला सांगितले. पण आंदोलन न थांबवता काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर गेले. जगताप यांनी कार्यकर्त्यांना मागे लोटले. आंदोलनाच्यावेळी कार्यकर्त्यांनी मास्क घातला नव्हता. कोरोनाच्या नियम न पाळल्याने भाई जगताप यांच्या कार्यकर्त्यांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment