मुंबई - मुंबईत मागील काही दिवसांपासून रोज आढळणा-या रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम राहिला असून रुग्ण संख्या एक हजारच्या आत स्थिर राहिली आहे. २४ तासात ७४६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात १२९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी धोका कायम आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या सातशे ते साडेपाचशेच्या दरम्यान नोंद होते आहे. रविवारी ७४६ रुग्ण आढळले आहेत. शनिवारी ही संख्या ६४८ वर होती.
आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख २० हजार ३५६ वर गेली आहे. तर ६ लाख ९४ हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १५३९६ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत ८५८२ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मागील २४ तासांत ३२७११ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९६ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७२८ वर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
No comments:
Post a Comment