
मुंबई - जे नागरिक आजारपणासह शारीरिक, वैद्यकीय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, अशा व्यक्तींचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण, त्यांच्या घरी जाऊन करण्याची कार्यवाही, के/पूर्व प्रभागापासून प्रायोगिक तत्त्वावर आज (दिनांक ३० जुलै २०२१) सुरु झाली आहे. आज पहिल्या दिवशी एकूण ३७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. पैकी १४ जण वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत. तर उर्वरीत २३ जणांच्या घरी जाऊन त्यांना लस दिली गेली.
या लसीकरणाचा प्रारंभ करताना आमदार रमेश लटके, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष राजुल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रियंका सावंत, नगरसेवक अभिजीत सामंत, सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ, आरोग्य अधिकारी उर्मिला पाटील हेदेखील उपस्थित होते. सदर लसीकरण उपक्रमास प्रोजेक्ट मुंबई या बिगर शासकीय सेवाभावी संस्थेचे देखील सहकार्य लाभत आहे.
No comments:
Post a Comment