एम्पेरिकल डाटा सादर हाेत नाही ताेवर पालिका घेवू नये - प्रकाश शेंडगे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एम्पेरिकल डाटा सादर हाेत नाही ताेवर पालिका घेवू नये - प्रकाश शेंडगे

Share This


मुंबई - मुंबई महानगर पालिका निवडणुकीसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी हाेत असून ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यामुळे या समाजात प्रक्षाेभ निर्माण झाला आहे. त्यामुळे ओबीसींचा एम्पेरिकल डाटा सादर हाेत नाही ताेवर पालिका घेवू नयेत, त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहे. या निवडणुकीत ओबीसींसाठी असलेल्या आरक्षित जागा खुल्या करून निवडणुका होणार आहेत. याचा फटका ओबीसी समाजाला बसणार असून खुल्या गटातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे.

पालिकेच्या २२७ नगरसेवकांच्या जागांसाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडणुकीच्या वेळी २२७ जागांमध्ये ५० जागा महिलासांठी राखीव होत्या. १५ जागा अनुसूचित जातींसाठी, २ जागा शेडूल्ड ट्राइब्ससाठी तर ६१ जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. तर खुल्या प्रवर्गातील जागा 149 इतक्या होत्या त्या आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने 210 इतक्या होणार आहेत. असे झाल्यास खुल्या प्रवर्गातून लढणाऱयांची संख्या वाढेल.

ओबीसींचे आरक्षण रद्द केल्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत ओबीसींचे नुकसान होणार असून एम्पीरिकल डाटा जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूका घेवू नयेत अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages