इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर टेक्साईल म्युझियम उभे राहणार, ४ कोटीचा खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2021

इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर टेक्साईल म्युझियम उभे राहणार, ४ कोटीचा खर्चमुंबई - मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास सर्वांना माहिती होण्यासाठी काळाचौकी येथील दि इंडिया युनायटेड मिल क्रमांक २ व ३ च्या जागेवर रिक्रिएशन ग्राऊंड- कम टेक्साईल म्युझियम उभे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही जागा एनटीसीकडून महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली आहे. टप्पा १ मधील परिसराचे लँडस्केपिंग करून सुशोभिकरण करणे, अंतर्गत रस्ते, कुंपन भिंतीला लावून ऐतिहासिक स्वरुप देणे, वारली चित्रे आदी अतिरिक्त कामे केली जाणार आहेत. यासाठी ४ कोटी २८ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

या मिलमधील ४४००० चौ. मीटरचा परिसर महाराष्ट्र सरकारने रिक्रिएशन ग्राऊंड- कम टेक्साईल म्युझियमच्या वापरा करीता अधिसूचित केलेला आहे. महापालिकेतर्फे या जागेचे संवर्धन, संरक्षण, पुनर्वापर आणि विकास दोन टप्प्यात केला जाणार आहे. टप्पा -१ मध्ये ७००० चौ. मीटर जागेवर मुंबईतील गिरणगावचे जीवन व गिरणीबाबत नवीन पिढीला माहिती होण्यासाठी वस्त्रोद्योगाची म्युरल्स तसेच तळ्याचे व परिसराचे शुशोभिकरण मल्टिमीडिया संगीत कारंजे, ध्वनी व प्रकाशव्यवस्थेमार्फत चित्रिकरणातून मुंबई व गिरणी कामगारांच्या इतिहासाचे दर्शन घडवले जाणार आहे. मिल मधील संरक्षित तळे व त्या लगतचा परिसर यांचे सुशोभिकरण, प्रकाश व ध्वनी माध्यमातून गिरणीचा इतिहास व गिरणी कामगारांचे सामाजिक व सांस्कृतिक पैलू यांचे सादरीकरण केले जाईल. म्युरल्स व बहुउद्देशीय प्लाझाच्या कामाला २०१८ ला मंजुरी दिली आहे. तर दुस-या टप्प्यात ३७००० चौ. मीटर जागेत टेक्साईल म्युझियम, वाचनालय, सभागृह, कलाप्रदर्शन, पब्लिक प्लाझा आदी बाबींकरीता अंतर्गत बदल करून या पुरातन वास्तूंचे संवर्धन आणि पुनर्वापर करण्याचे प्रस्तावण्यात आले आहे. मुंबई संस्कृती वारसा जतन समितीने टप्पा २ व ३ च्या कामाच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. लवकरच टप्पा २ साठी निविदा मागवण्यात येणार आहे.

ही कामे केली जाणार -
- परिसराचे फुलझाडे लावून सुशोभिकरण करणे
- अंतर्गत रस्ते व वाहनतळ निर्माण करणे
- कुंपण भिंतीला जीआरसी लावून ऐतिहासिक स्वरुप देणे
- कंट्रोल इमारतीवर वारली चित्र काढणे
- अग्निशमन व्यवस्था

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad