लॉकडाऊन - राज्यात पुढच्या आठवड्यापासून निर्बंध शिथील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लॉकडाऊन - राज्यात पुढच्या आठवड्यापासून निर्बंध शिथील

Share This


मुंबई : राज्यातील कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गाचा दुसरा टप्पा ओसरला असला तरी तिसरा टप्पा घातक असल्यामुळे राज्यात लॉकडाऊन कायम आहे. पण हे लॉकडाऊन आता पुढच्या आठवड्यापासून शिथील केले जाण्याची शक्यता आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देता येतील याबाबतचा अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या अहवालाबाबत चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात टप्प्याटप्प्याने सर्व आस्थापना सुरु करण्याचा प्लॅन तयार आहे. वेळ वाढवण्याबरोबरच उपस्थितीची मर्यादाही शिथील केली जाणार आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांना उपस्थितीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली. 

पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जातील. यात रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाणार आहे. तसेच ५० टक्क्याची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र तिसर्‍या लाटेच्या दिशेने? तज्ज्ञांचे संकेत -
जुलै महिन्याच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे ८८ हजार १३० रुग्ण आढळून आले. ह्या आकडेवारीमुळे आता तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त कऱण्यात येत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही वाढ तिसर्‍या लाटेची सुरुवात असू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages