
कोची : केरळमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने सरकारचे टेन्शन वाढवले आहे. अशातच, ज्या लोकांनी कोरोना लस घेतली आहे, अशांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, की केरळमध्ये जवळपास ४० हजार कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांना संपूर्ण लसीकरण झाले असतानाही कोरोनाची लागण झाली.
केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. हे सॅम्पल कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णांशी जुळवले जातील. लस घेतलेली असतानाही येथे लोक कोरोना संक्रमित होत आहे, हे सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. मात्र, हा डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे अधिकांश रुग्ण येथील पथानामथिट्टा जिल्ह्यात आढळले आहेत.
No comments:
Post a Comment