अहवालात छेडछाड - परमबीर सिंगांकडून सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2021

अहवालात छेडछाड - परमबीर सिंगांकडून सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच



मुंबई -  अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंद संघटनेचं नाव अहवालात घुसवण्यासाठी तसेच अँटिलिया स्फोटक प्रकरणातील अहवालात छेडछाड करण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सायबर तज्ज्ञाला ५ लाख रुपये दिले, असा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात एनआयएच्या आरोपपत्रात सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटक प्रकरणी १० हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.

जानेवारी महिन्यात दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. याची जबाबदारी जैश-उल-हिंद संघटनेने घेतली होती. त्याचा फायदा घेत परमबीर सिंह यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणात जैश-उल-हिंद संघटनेचं नाव घुसवण्यासाठी लाच दिली. एनआयएच्या आरोपपत्रात असा आरोप करण्यात आला आहे. एनआयएने सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवला असून यात त्याने परमबीर सिंग यांनी ज्या सायबर तज्ज्ञाकडून रिपोर्ट बनवून घेतला, तो सीपी मुंबई या ऑफिशियल मेल आयडीवर मी पाठवला, असं जबाबात म्हटलं आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात एक मोठा कट असून आणखी काही संशयित असल्याचा दावा एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

परमबीर सिंग यांनी या सायबर तज्ज्ञाला विश्वासात घेण्यासाठी हे ऑफिशियल आणि खूप कॉन्फिडेनशीयल काम असून यासंदर्भात मी एनआयएच्या आयजींशीही बोलणार आहे असं सांगितलं होतं. दिल्लीतल्या इस्रायल एम्बसीसमोर झालेला ब्लास्ट ज्या पद्धतीने दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्याची पाळंमुळं तिहार जेलमध्ये सापडली त्यावरुनच असाच अहवाल तयार करण्यासाठी परमबीर यांनी सायबर तज्ज्ञाला सांगितल्याची माहिती आहे. यासाठी त्या तज्ज्ञाला परमबीर सिंग यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावलं होतं. तिथे त्याने बसून अहवाला छेडछाड केली, असं सायबर तज्ज्ञाने त्याच्या जबाबात म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad