कळमना-पारडी उड्डाणपुलात भ्रष्टाचार असल्यानेच खांब कोसळले - जयदीप कवाडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कळमना-पारडी उड्डाणपुलात भ्रष्टाचार असल्यानेच खांब कोसळले - जयदीप कवाडे

Share This

मुंबई/नागपूर - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अतीशय संथगतीने तयार होत असलेला उपराजधानीतील कळमना-पारडी उड्डाणपुलाबद्दल बोलावे तितके कमीच आहे. कारण, जवळपासून साडेचार वर्षाचा कालावधी लोटला तरी पूल बनणार की नाही अशी शंकाच शहरासह पूर्व नागपुरातील जनतेला आधीच होती. मात्र, मंगळवारी रात्रीला चिखली चौक ते एचबी टाऊन पारडी मार्गावरील पुलाचे दोन खांब अचानक कोसळल्या गेले यात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. परंतु, पुलाच्या कामात असलेल्या संथ गतीमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्यानेच पूल कोसळल्या गेल्याचा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केले.

कवाडे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उपराजधानीतील कळमना-पारडी उड्डाणपुलाचे ऑगस्ट 2014 मध्ये थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले. मात्र, 22 महिन्यानंतर जून 2016 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. जून 2019 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन सुध्दा देण्यात आली. परंतु, तब्बल 52 महिने लोटल्यानंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास आला नाही. आजही केवळ 60 ते 65 टक्केच पूल तयार झाले नाही. याशिवाय गेल्या साडेचार वर्शापासून पूलाच्या बांधकामामुळे अनेक रस्ते अपघातात अनेकांना आपला जिव गमवावा लागला. मंगळवारी झालेल्या दुर्देवी घटनेत जर जिवीतहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुलाचे जे पिल्लर कोसळले गेले यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह नेते मंडळी सुध्दा जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांसह स्थानिक जनप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी असेही ते म्हणाले.

52 महिन्यांचा कालावधी लोटला -
खरे तर 21 ऑगस्ट 2014 मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले मात्र, 448 कोटी रुपयांच्या किमतीसह मार्च 2016 मध्ये काम सुरू करण्यात आले. जून 2019 मध्ये उड्डाणपूल तयार होण्याचे स्वप्न 2020 संपल्यावरतही पूर्ण झाले नाही. एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2021 पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले. मात्र, या पुलाच्या बांधकामाला 52 महिन्यांचा कालावधी लोटला असतानाच मंगळवारच्या घटनेमुळे या पुलाला 2022 वर्श पहावचे लागणार यातून दिसत आहे. लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे राजकीय नेते नागरिकांना स्वप्न दाखविणे थांबवत नसल्याची आजची स्थिती आहे. दुसरीकडे अपूर्ण कामांमुळे पूर्व नागपूरकर वैतागल्याचे आहेत. जनतेच्या या त्रासाला लवकरात लवकर प्रशासनाने दूर करावे अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टी लवकरच जनआंदोलन उभारणार असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages