कांदिवलीत हंसा हेरिटेज इमारतीला आग, 2 जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कांदिवलीत हंसा हेरिटेज इमारतीला आग, 2 जणांचा मृत्यू

Share This


मुंबई - कांदिवली पश्चिमेकडेही एक भीषण आग लागली असून, या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील मथुरादास रोडवर असलेल्या हंसा हेरिटेज या निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावर अचानक आग लागली. या आगीत सुमारे 7 जण अडकले होते, त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

रात्री आठच्या सुमारास आग लागली होती, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. घटनास्थळी पोहोचत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि दोन जणांचा मृत्यू झाला. कांदिवलीतील आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. रंजनाबेन पारेख 90 वर्ष व निता पारेख 64 वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

दिव्यांमुळे आग लागली -
या घटनास्थळाला मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकरांनी भेट दिली असून, त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतलाय. चौदाव्या माळ्यावरती, आपण दिवे लावतो त्या दिव्यांमुळे आग लागली आहे, असं त्यांच्या घरातील एक सदस्य मला भेटले आणि त्यांनी मला हे सांगितलं. अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत. प्रयत्नांची शिकस्त आहे. काही जण जखमी आहे, तर मृत्यूही झाल्याचं मला माहिती मिळालीय, असंही त्या म्हणाल्यात.

काही लोक त्यात अडकले आहेत. त्यांना आम्ही खालून फोनवरून मार्गदर्शन करतोय. ओला कपडा नाकावर ठेवा, जेणेकरून श्वास गुदमरून जो मृत्यू होतो तो होणार नाही. अशा सूचना आम्ही देत आहोत. आग आता नियंत्रणात आलीय. अजूनही पाच लोक आतमध्ये आहे. तर एका फ्लॅटमध्ये दोन लोक आहेत, ते स्वतः हँडिकॅप आहेत. त्यांनाही बाहेर काढण्यासाठी आमचे लोक गेलेले आहेत. वर जाऊन ते प्रयत्न करत आहेत, असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages