नगरसेवकांच्या संख्येत वाढ, काँग्रेसकडून स्वागत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 November 2021

नगरसेवकांच्या संख्येत वाढ, काँग्रेसकडून स्वागत

 

मुंबई - मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. या निर्णयाचे मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले आहे. या निर्णयामुळे काँग्रेसचे नगरसेवक वाढतील तसेच काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय मुंबईचा महापौर होणार नाही अशी प्रतिक्रिया रवी राजा यांनी दिली आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी सरकराने महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या व राज्यात सत्तधारी असलेल्या महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वागत केले आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. काही प्रभागात कमी मतदार तर काही प्रभागात जास्त मतदार होते. सर्व विभागात समान मतदार असल्यास आणि जास्त नगरसेवक असल्याने संपूर्ण मुंबईचा चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकणार आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली आहे. तसेच पालिकेच्या निवडणूकीत नगरसेवकांची कामे बघून मतदान केले जाते. पालिकेत गेल्या पाच वर्षात केलेले काम तसेच महाविकास आघाडीचे काम बघून महाविकास आघडीला त्याचा फायदा होईल. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक वाढतील. त्यामुळे काँग्रेसच्या पाठींब्याशिवाय मुंबईचा महापौर बनू शकणार नाही असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad