भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली ही चांगली गोष्ट - जयंत पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली ही चांगली गोष्ट - जयंत पाटील

Share This


मुंबई दि. १७ नोव्हेंबर - भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला.

भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages