12 कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह आल्याने दादरची लाल पॅथ लॅब सिलमुंबई - दादरच्या गोखले रोड वरील लाल पॅथ लॅबमधील एक कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात आलेल्या लॅबमधील इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या असता 11 कर्मचारी पॉजिटिव्ह आले आहेत. लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आल्याने लाल पॅथ लॅब सील करण्यात आल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 

जनता कॉलनी वरळी कोळीवाडा 
येथील एक 44 वर्षीय व्यक्ती  22 डिसेंबरला कोरोना पॉजिटीव्ह आला. हा व्यक्ती दादरच्या गोखले रोड वरील लाल पॅथ लॅबमध्ये पॅन्ट्री बॉय म्हणून कामाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 36 लोकांचा शोध घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात पालिकेच्या दादर येथील हेल्थ पोस्टच्या कर्मचाऱ्यांनी लाल लॅबमधील 19 कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यात लॅबमधील 12 कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. लॅबमधील 12 कर्मचारी एकाचवेळी कोरोना पॉजिटीव्ह आल्याने पालिकेने ही लॅब सील केली आहे. तसेच पॉजिटीव्ह आलेल्या लॅब मधील कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती घेऊन त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती किरण दिघावकर यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments