वरळी सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील ४ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2021

वरळी सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील ४ महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यूमुंबई - वरळी बीडीडी चाळ नंबर तीन मध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या सिलिंडर स्फोट दुर्घटनेत पुरी कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. या जखमींपैकी मंगेश पुरी ( ४ महिने) या चिमुरड्याचा मंगळवारी रात्री कस्तुरबा रुग्णालयात उशिरा मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

वरळी कामगार वसाहत, बीडीडी चाळ नंबर ३ मधील एका घरात गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत आनंद पुुुरी ( २७), विद्या पुरी ( २५), विष्णू पुरी ( ५ वर्ष ), मंगेश पुरी ( ४ महिने ) एका कुटुंबातील हे चौघे जखमी झाले असता चौघांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या चौघांपैकी तिघांना कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. तर मंगेश पुरी ( ४ महिने) याचा कस्तुरबा रुग्णालयात रात्री उशिरा मृत्यू झाला. विद्या पुरी या ६० टक्के भाजल्या असून विष्णू पुरी २० टक्के भाजले आहेत. तर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आनंद पुरी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालयाततुन देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad