Corona - मुंबईकरांची चिंता वाढली - २४ तासात ९२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2021

Corona - मुंबईकरांची चिंता वाढली - २४ तासात ९२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद



मुंबई - मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना डिसेंबर महिन्यात पुन्हा वाढतो आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनाचे तब्बल ९२२ नवीन रुग्णांची नोंद (922 new corona patients registered in 24 hours) झाल्याने चिंता वाढली आहे. १ डीसेंबरला १०८ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र त्यांनतर कोरोनाचा आलेख चढता राहीला आहे. मागील १३ दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रविवारी रुग्णसंख्या हजारच्या उंबरठ्यावर आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या त्यात ओमायक्रॉनचा शिरकाव यामुळे  मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. 

आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७,७१,११२ वर पोहोचली आहे. तर रविवारी कोरोनामुळे दोन मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १६,३७० झाली आहे. रविवारी दिवसभरात ३२६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ७,४७,८६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४,२९५ सक्रिय रुग्ण असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के, कोविड रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के तर रुग्णदुपटीचा कालावधी १,१३९ वर घसरला आहे. दिवसभरात ३४,८१९ चाचण्या करण्यात आल्या. 

अशी झाली रुगसंख्येत वाढ- 
१४ डिसेंबर-२२५
१५ डिसेंबर-२३८,
१६ डिसेंबर -२७९,
१७ डिसेंबर-२९५,
१८ डिसेंबर-२८३,
१९ डिसेंबर-३३६,
२० डिसेंबर-२०४,
२१ डिसेंबर-३२७,
२२ डिसेंबर-४९०,
२३ डिसेंबर-६०२,
२४ डिसेंबर-६८३,
२५ डिसेंबर- ७५७,
२६ डिसेंबर- ९२२.

शून्य मृत्यूचे दिवस- 
१७ ऑक्टोबर, ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर आणि २५ डिसेंबर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad