राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 December 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मुंबईत आगमनमुंबई, दि. 7 : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे राजभवनकडे प्रयाण झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad