बेस्टने स्वतःच्या पायावर उभे राहावे - रवी राजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2021

बेस्टने स्वतःच्या पायावर उभे राहावे - रवी राजा

 

मुंबई - आर्थिक संकाटात असलेल्या बेस्टने २०२२ - २३ या आर्थिक वर्षासाठी २२०० कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प फसवा आणि बेकायदेशीर असल्याची टीका भाजपने केली आहे. तर बेस्टने पालिकेकडून अनुदान मिळेल या आशेवर न राहता स्वतःच्या पायावर उभे राहावे असा सल्ला काँग्रेसचे पालिकेतील गटनेते रवी राजा यांनी दिला आहे.

बेस्टने स्वतःच्या पायावर उभे राहावे -
बेस्ट उपक्रम गेली कित्तेक वर्षे आर्थिक अडचणीत आहे. या उपक्रमाचा सन २०२२ - २३ चा २२३६ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. बेस्ट समितीच्या मंजुरी नंतर हा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला होता. यावेळी बोलताना बेस्टचा २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. याआधीही पालिकेने बेस्टला सुमारे ४५०० कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतरही बेस्टचा तोटा कमी झालेला नाही. बेस्टला एकूण ९ हजार कोटी रुपयांचा तोटा आहे. इतकी रक्कम पालिकेला द्यावी लागणार आहे. बेस्ट उपक्रम सतत पालिकेच्या जीवावर जगणार आहे का असा प्रश्न उपस्थित करत बेस्स्टकडे ३२० एकरची जागा आहे. या जागांचा विकास करून बेस्टने जी तूट आहे ती तूट कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. या जागांचा विकास करून स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी सूचना काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली.

अर्थसंकल्प फसवा आणि बेकायदेशीर -
पालिकेच्या नियमानुसार १ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर करावा लागतो. मात्र हा अर्थसंकल्प २२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मागील वर्षापर्यंत बेस्टला ६६०० कोटींची तूट होती. आताची तूट धरून बेस्ट उपक्रमाला ९ हजार कोटींची तूट आहे. ही तूट पालिका भरून काढणार आहे का असा प्रश्न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित केला. बेस्ट स्वतःचा ३३३७ बसचा ताफा आहे तसाच ठेवेल असा करार पालिका आणि बेस्टमध्ये झाला आहे. आज बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या २१९४ बसेस आहेत. यामुळे हा अर्थसंकल्प फसवा आणि बेकायदेशीर असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.

बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढा -
यावर बेस्टच्या वीज विभागात तूट दिसत असली तरी यापुढे एमईआरसीच्या सुचनेप्रमाणे वीज विभागाचे वेगेळे अकाउंट ठेवले जाणार आहे. भविष्यात ही तूट दिसणार नाही. बेस्टच्या वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी नेटवर्क चांगले करण्यासाठी कॉल सेंटर व स्मार्ट मीटर लावले जातील. असे केल्याने कंट्रोल रूममध्ये कुठे फॉल्ट आहे हे समजेल. बेस्टच्या ताफ्यात पुढील १८ महिन्यात २१०० बसेस येणार आहेत. बेस्टकडे सध्या २८६ इलेक्ट्रिक बसेस आहेत, मार्च २०२३ पर्यंत बेस्टच्या ५० टक्के बसेस इलेक्ट्रिकच्या असतील. प्रवाशांसाठी डिजिटल तिकीटिंग, बस कधी येणार याची माहिती मिळेल. या माध्यमातून प्रवासी वाढवून महसूल वाढवला जाईल. बेस्टला पालिकेने ४४५० कोटींचे अनुदान देऊन सहकार्य केले आहे. बेस्टला २२३६ कोटी तुटीसह ६६०० कोटींची देणी आहेत. यासाठी पालिकेने अनुदान देऊन हा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर करावा अशी मागणी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी केली.

अर्थसंकल्प बहुमताने मंजूर -
बेस्ट मुंबईकरांची लाईफलाईन आहे. मुंबईकर नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी पालिकेकडून नेहमीच मदत करण्यात आली आहे. आता सादर झालेल्या २२०० कोटी तुटीच्या अर्थसंकल्पावर २ तास चर्चा करण्यात आली. यात काँग्रेसकडून जावेद जुनेजा, विरोधी पक्ष नेते रवी राजा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट तसेच मी स्थायी समितीत चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर हा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर केला. आता हा अर्थसंकल्प पालिका सभागृहाकडे पाठवला असून त्याठिकाणी चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad