भाजपा आमदार आशिष शेलारांवर लैंगिक शेरेबाजी प्रकरणी गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2021

भाजपा आमदार आशिष शेलारांवर लैंगिक शेरेबाजी प्रकरणी गुन्हा दाखलमुंबई - राज्यात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेला लक्ष केले जात आहे.   भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात टीका करताना महिलेला लज्जा येईल अशी टीका केली होती. महापौरांच्या तक्रारीवरून आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात विनयभंग आणि लैंगिक शेरेबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिनांक 4/ 12/ 21 रोजी आमदार आशिष शेलार यांनी बीजेपी पक्ष कार्यालय जीवन विमा मार्ग मरीन ड्राइव मुंबई येथे पत्रकार परिषदत घेवून “ कोठे निजुन दाखवल होत? झोपला कुठे होता” असे बोलुन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या स्त्रीसुलभ मनास लज्जा उत्पन्न होऊन विनयभंग केला आणि लैंगिक शेरेबाजी केली. याबाबत महापौरांनी आज रोजी पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांचे विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याने (गु क्र 386/ 21) कलम 354 -अ,(4), 509 भा द वि मुसद आमदार आशिष शेलार यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज तुम्ही सत्तेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग करून जरूर तुम्ही गुन्हे दाखल करा. पण सत्य समोर येईलच अशी प्रतिक्रिया आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. 

आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या टिकेबाबत महापौरांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका आणि महिला आघाडीने सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन शेलार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर शेलार यांनी असं काही म्हटले नाही, सोशल मीडियावरून महापौरांची बदनामी केली जात आहे. सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा नगरसेविकांकडून करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad