शिवरायांच्या पुतळ्यांची विटंबना - शिवसेनेची भाजप कार्यालयासमोर निदर्शने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 December 2021

शिवरायांच्या पुतळ्यांची विटंबना - शिवसेनेची भाजप कार्यालयासमोर निदर्शनेमुंबई - कर्नाटकात बंगळुरू येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांची विटंबना केल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रकारही झाला. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राप्रमाणे समस्त देशवासीयांचेही दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची बिटंबना करणे हे कोणालाही रुचणारे नाहीच, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी ही क्षुल्लक घटना असल्याचे वक्तव्य केल्याने संतापात अधिकच भर पडली. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेना निदर्शकांकडून त्यांना शिवीगाळ करण्यात आली, त्याचदरम्यान पोलीस दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. मंत्रालयासमोर शिवसेनेच्या शिवालय कार्यालयासमोरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad