महापरिनिर्वाण दिन - अन्यथा भीम अनुयांसह चैत्यभूमीवर प्रवेश करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2021

महापरिनिर्वाण दिन - अन्यथा भीम अनुयांसह चैत्यभूमीवर प्रवेश करणारमुंबई - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरला ६५ व्या महापरिनिर्वानदिनी चैत्यभूमीवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे चैत्यभूमीवर येणा-या लाखो अनुयायांना प्रवेश दिला जाणार नसल्याने संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नवा विषाणू ओमायक्रॉनची भिती दाखवून चैत्यभूमीवर येण्यास यंदाही निर्बंध लावले. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय चुकीचा असून समितीने यावर पुनर्विचार करावा, अन्यथा लाखो आंबेडकरी अनुयायांसोबत चैत्यभूमीवर प्रवेश केला जाईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनाला त्यांचे स्मृतीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास वंचित ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या पाल्यांच्या लग्न समारंभात, पक्षांच्या सभा मेळाव्यात होणारी गर्दी चालते, तसेच गेल्या महिन्यात पंढरपुरात कार्तिकी वारीला लाखो भाविकांची गर्दी झाली होती. मात्र, कोट्यवधी भीम सैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर गर्दी चालत नाही, हे दुर्दैव आहे, असे जयदीप कवाडे यांनी म्हटले आहे. प्रशासनाने या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा. तसेच चैत्यभूमीवर लादलेले निर्बंध काढून कोविड नियम पाळून अभिवादनास परवानगी द्यावी अशी मागणी कवाडे यांनी केली आहे. येत्या तीन दिवसांत सरकारने यावर निर्णय घेतला नाही, तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी लाखो भीम सैनिकांसह चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल होतील असे कवाडे यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad