म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक

Share This


पुणे - आरोग्य विभागाचे पेपर फोडणार्‍यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणार्‍या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या व या आठवड्यात होणार्‍या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

म्हाडाची पूर्व परिक्षा आज होणार होती. तसेच या आठवडाभर परिक्षा घेण्यात येणार होती. या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारी घेण्यात येणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून सांगतो की, काही अपरिहार्य कारणावरुन व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी परिक्षा व या आठवड्यात होणार्‍या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारीमध्ये घेण्यात येतील. ही माहिती मी इतक्या रात्री देत आहे़ की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी परिक्षा केंद्रावर जाऊ नये़ त्यांनी घरीच थांबावे.  

प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परिक्षा घेणार्‍या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages