आरएसएस-भाजपला रोखण्यासाठी वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा - ॲड. प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2022

आरएसएस-भाजपला रोखण्यासाठी वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा - ॲड. प्रकाश आंबेडकरमुंबई - उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दादर येथील आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली.  या संदर्भात बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'आरएसएस-बिजेपीचे केंद्रातील सरकार ईडी, इनकम टॅक्स, आणि सीआयडी सारख्या एजन्सीचा वापर करून विरोधी पक्ष खिळखिळा करू पाहत आहे. बिजेपीला येत्या २०२४ मध्ये स्वतःचा मार्ग मोकळा करून देशाचे संविधान बदलण्याचे राजकारण सुरु करायचे आहे. या पक्षांचा केंद्रात जाण्याचा मार्ग उत्तर प्रदेश मधून जातो. पण आताच्या परिस्थितीमध्ये बसपा किंवा चंद्रशेखर आझाद हे बीजेपीला टक्कर देऊ शकतील असे वाटत नाही. त्यामुळे सध्या समाजवादी पक्ष विरुद्ध आरएसएस अशी परिस्थिती आहे म्हणून असा निर्णय घेतला आहे. आंबेडकरी जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा.

आंबेडकरवादी मतदाराचे स्वतंत्र अस्तित्व आहे. एका निवडणुकीमध्ये बायपास दिला तर फरक पडत नाही असे आम्ही मानतो. आपण स्वतःचे अस्तित्व हे निवडणुकीनंतर देखील सुरुवात करता येईल. मानवतावादी, सेक्युलरवादी, आंबेडकरवादी मतदारांनी समाजवादी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे' असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आरएसएस आणि बीजेपी वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युती अथवा पाठिंबा देण्यास सहमती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages