लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुंबईत सार्वजनिक सुट्टी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2022

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मुंबईत सार्वजनिक सुट्टीमुंबई - लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (सन १९८१चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उद्या सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा सुरू - 
राज्य शासनाच्या या आदेशानुसार बृहन्मुंबईतही उद्या दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कार्यालये, महानगरपालिका कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी बंद राहतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad