रशिया युक्रेन युद्धामुळे भारतात महागाई वाढणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 February 2022

रशिया युक्रेन युद्धामुळे भारतात महागाई वाढणारनवी दिल्ली - रशिया युक्रेन युद्धाचे आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणावर परिणाम होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०१ डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. भारताच्या अर्थकारणावर याचा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला असल्याचे इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्या देशात महागाईचा आगडोंब उसळू शकतो. इंधन दरात १० मार्चनंतर वाढ होण्याची शक्यता आहे.
(Russia-Ukraine war will increase inflation in India)

आज सकाळीच रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजार कोसळला असून, बाजार सुरू होताच सेन्सेक्स १,६०० अंकांनी घसरला. ही घसरण २००० अंकांपर्यंत गेली होती. आज झालेल्या पडझडीत जवळपास १० लाख कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारावर युद्धाच्या तणावामुळे विक्रीचा दबाव आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू राहिल्यास चलन विनिमय दरावर परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. रुपयाचा दर घसरल्याने व्यापार खर्च वाढू शकतो. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम मेटल सेक्टरवरही दिसून येणार असून, भारताला रशियाकडून मोठ्या प्रमाणात धातूचा व्यापार होतो. याचा फायदा वाहन क्षेत्राला होतो. युद्धामुळे धातूच्या आयतीवर निर्बंध लागू झाल्यास वाहन क्षेत्राला फटका बसण्याची भीती आहे.

वर्ष २०२१ मध्ये, भारताने रशियाला एकूण ५५० दशलक्ष डॉलर्सची निर्यात केली आहे. रशियाकडून २६० दशलक्ष डॉलर्स आयात व्यापार झाला आहे.रशियाकडून गॅस आयात
रशियाकडून ०.२० टक्के गॅस आयात केला जातो. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने नुकतेच एलएनजीसाठी करार केला आहे. या अंतर्गत २० वर्षांसाठी दरवर्षी २.५ दशलक्ष टन आयात करण्याचा करार करण्यात आला आहे. अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांमध्ये तेल आणि वायूच्या निर्यातीवर बंदी समाविष्ट नाही आणि रशिया तेल आणि वायूची निर्यात सुरूच ठेवणार आहे. ही काहीशी दिलासा देणारी बाब आहे.

भारताच्या संरक्षण सज्जतेवर परिणाम
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करतो. भारतीय लष्करात जवळपास ६० टक्के शस्त्रे ही रशियन बनावटीची आहेत. त्याशिवाय रशियाकडून एस-४०० ही क्षेपणास्त्रविरोधी एअर डिफेन्स सिस्टीम भारताला मिळणार आहे. युद्ध पेटल्यास रशियावर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रशियाकडून भारताला होणारा शस्त्र पुरवठा खंडित होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad