शिवसेनेकडून कंत्राटदार, टक्केवारीवाल्यांचे हित जोपासण्याचे काम - आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 February 2022

शिवसेनेकडून कंत्राटदार, टक्केवारीवाल्यांचे हित जोपासण्याचे काम - आशिष शेलार



मुंबई - सत्य जे काय आहे ते संबंधित एजन्सी समोर आणतीलच. त्यांच्या वतीने बोलण्याचा मला अधिकार नाही. ते योग्यही होणार नाही. पण जर कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्याची झाली असेल तर ४० हजार कोटी रुपये ज्या अर्थसंकल्पाचे खर्च होतात, तो कर भूमिपुत्रांनीच दिलेला आहे. त्याचा हिशोब भूमिपुत्रांनीच मागितला आहे. भूमिपुत्रांच्या पैशावर भ्रष्टाचाराचे मजले तुम्ही बांधले, त्या विरोधात खरी भूमिपुत्रांची लढाई आहे. भाजप ही भूमीपुत्रांचीच लढाई लढते आहे. तर कंत्राटदार आणि टक्केवारीवाल्यांची लढाई हा महापौर आणि शिवसेनेचा कार्यक्रम आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली. शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली.

आशिष शेलार यांनी या पत्रकार परिषदेत आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीची माहिती दिली. ही बैठक नियोजित असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व कोअर कमिटीचे सदस्य आज अतिशय राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर आणि संघटनेच्या अति महत्त्वाच्या बाबींवर आज जवळजवळ पूर्ण दिवस या बैठकत चर्चा करणार आहेत, असे शेलार सांगितले. राज्यासमोर गंभीर प्रश्न आ वाचून उभे आहेत, सामान्य जनता कोरोनानंतर पुन्हा एकदा त्यांचं सुरळीत आयुष्य सुरु करावं म्हणून कामाला लागली आहे. त्या वेळेला राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी शेतकरी, कारखानदार, व्यावसायिक, युवक, महिला, बारा बलुतेदार या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभारावे ही प्राथमिकता आहे.मात्र सरकारची प्राथमिकता राज्याच्या प्रश्नांना, असंही त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार काम करते ते म्हणजे, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, आतंकवाद याच्या समर्थनार्थ पूर्णवेळ खर्च केला जातो आहे. भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरूपाचे वर्णन करावे लागेल इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad