मुंबई - मुंबई महापालिकेची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे येत्या दोन मार्च रोजी होणा-या स्थायी समितीच्या शेवटच्या सभेत विकास कामांचे विविध खाते, विभागांनी दोनशेहून अधिक प्रस्ताव सादर केले आहेत. हे प्रस्ताव एकाच दिवशी मंजूर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक २ मार्च रोजी होणार आहे. या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. शेवटची बैठक असल्याने प्रत्येक खात्याकडून तसेच विभागाकडून महापालिका चिटणीस विभागाला प्रस्ताव घेण्यासाठी धावपळ सुरु होती. प्रत्येक विभागांनी आपले प्रस्ताव समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवले आहेत.
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपणार असल्याने पुढे प्रशासक नियुक्त होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी हे प्रस्ताव मंजूर करून घेण्याची घाई सत्ताधारी पक्षाची असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यानुसार हे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे सुमारे दोन हजार कोटींच्या घरांमध्ये हे प्रस्ताव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी सकाळी स्थायी समिती सदस्यांना हे प्रस्ताव पाठवण्यात आले. आतापर्यंत १७९ प्रस्ताव समितीच्या पटलावर ठेवण्यात आले असले तरी अजून २५ हून अधिक जोड प्रस्ताव तथा अतिरिक्त प्रस्ताव पाठवले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हे प्रस्ताव २००च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment