ताडदेव आग दुर्घटनेतील इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा होती बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2022

ताडदेव आग दुर्घटनेतील इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा होती बंद



मुंबई  - ताडदेव येथील ‘सचिनम हाइटस’ या उत्तुंग इमारतीला २२ जानेवारीच्या आग दुर्घटनेत ९ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती. या आगीच्या चौकशीत इमारतीत अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टीम बंद असल्याची माहिती प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आली आहे. तसेच विकासकाने या इमारत पूर्णत्वाचा दाखला पालिकेला सादर केला नव्हता असा नियुक्त केलेल्या चौकशी समितीकडून अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अहवालात कारण देण्यात आलेले नाही. मात्र इमारतीत सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत व त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना समितीने केल्या आहेत. 
  
ताडदेव येथील सचिनम हाइटस इमारतीला २२ जानेवारीला सकाळी ७.३० च्या सुमारास १९ व्या मजल्यावर आग लागून त्यात नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर २१ जण जखमीही झाले होते. या दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. समितीने यानुसार आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. चौकशी अहवालात इमारतीच्या जिन्यांवर मोकळ्या जागेत चप्पल ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेले रेक, लाकडी दरवाजे, वायरिंग यामुळेही आग भडकल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी पूर्ण करण्यासाठी सोसायटीला ८ जानेवारी २०१८ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. नियमाप्रमाणे इमारतीमधील सदनिकेचा मुख्य दरवाजा अग्निप्रतिबंध असतो. मात्र अनेक सदनिका धारकांनी फेरफार करताना हे दरवाजे बदलले. त्यामुळे आगीचा भडका उडाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, इमारतीत सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा आदी नियमांची अंमलबजावणी तातडीने कराव्यात अशा सूचना समितीने केल्या आहेत.

यावर चौकशी समितीची निरीक्षणे - 
- अग्निशमन यंत्रणा सुरू असल्याबाबतचा वर्षातून दोन वेळा सादर करावयाचा अहवाल सोसायटीने सादर केला नाही.
- जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात कोणतीही हयगय झालेली नाही.
- काही मजल्यांवर २ ते ३ सदनिकांचे एकत्रीकरण करून मूळ भिंती काढून टाकण्यात आल्या.
- प्रत्येक मजल्यावर आवश्यक असणारी ओपनिंग स्पेस नव्हती. सार्वजनिक स्पेसेसमध्ये अतिक्रमण

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad