विरारमधील धार्मिक कार्यक्रमात गुजराती गायिकेवर नोटांची उधळण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2022

विरारमधील धार्मिक कार्यक्रमात गुजराती गायिकेवर नोटांची उधळणविरार : गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिकेवर लाखो रुपयांच्या नोटा (Notes thrown on Singer) भिरकावल्याचा दावा केला जात आहे.

विरारमध्ये (Virar) धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस पाडल्याचं चित्र पाहायला मिळालं. गायिका गाणं गात असताना ताल धरत तिच्या अंगावर शेकडो जणांनी नोटांचे बंडलच्या बंडल उधळल्याची माहिती आहे. नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरार पोलिसांना याची थोडीसुद्धा कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वयंचैतन्य शक्तीपीठ आनंद धाम गोशाळाच्या माध्यमातून विरार पूर्वेकडील रायपाडा परिसरातील गोशाळेत हा कार्यक्रम झाला होता. 19 फेब्रुवारी रोजी शनिवारी रात्री 9:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला असल्याची माहिती समोर आली आहे.

राजस्थानमधील प्रसिद्ध गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवणी आराधक गोविंदभाऊ गाढवी, लोकसाहित्यिकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याचा हा धार्मिक कार्यक्रम होता. गाणे चालू असताना एकामागून एक जण येऊन पैशाची उधळण करत असतानाचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

वसई-विरारसह मीरा भाईंदर, पालघर, मुंबई, ठाणे, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो गुजराती नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

माँ भगवती आणि हर्सीता दीदींच्या सहवासात पूर्ण रात्र अशे शीर्षक देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे पैशांची उधळण करुन, समाजाला कोणता संदेश देणार असा प्रश्नच या निमित्ताने निर्माण झाला आहे.

नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे विरार पोलिसांना याची थोडीसुद्धा कल्पना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad