कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2022

कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या मोहने परिसरात शिवजयंती (Shivjayanti)निमित्त काही तरुणांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी (Swords) नाचविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे. या व्हिडिओच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू करत या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयदीप पाटील आणि हर्षद भंडारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण-डोंबिवली शहरात देखील शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाईक रॅली, मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात देखील सायंकाळच्या सुमारास शिवजयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व काही शांततेत सुरू असताना या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचवल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad