पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 February 2022

पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरण



मुंबई - मुंबईत पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे, ही समस्याच सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करण्याचे निश्चित केले आहे.

विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मध्ये पार्कींगसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्या अंतर्गत नियम ५१ नुसार प्राधिकरणाची स्थापना करण्याचे ठरविले आहे. त्यासाठीपालिकेने बाहयस्त्रोत पध्दतीने वाहतुक क्षेत्रातील खाजगी व्यावसायिक, नगर रचनाकार आणि नगर संकल्प डिझाईनर, तज्ञ, धोरण संशोधक, भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) सर्वेक्षक आदी मनुष्यबळ पुरविण्याकरीता एजन्सीची नियुक्ती केली आहे. मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे काम प्रगतीपथावर आहेअसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले आहे. 

सोसायटयांमध्ये दिवसभर पार्किंग प्लॉट रिकामे असल्याने त्या ठिकाणी विशिष्ट कालावधीसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त चहल यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad