उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2022

उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्तमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) कारवाई केली (ED Action Sridhar Patankar) आहे. ईडीने त्यांच्या मेहुण्याची ६ कोटी ४५ लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ( Pushpak Bulian Case ) ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे शहरातील नीलांबरी नामक प्रकल्पात ११ सदनिका आहेत. या मालमत्ता श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या असल्याचे समजते. पाटणकर हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ आहेत. यापूर्वी याबाबत मनी लॉन्डरिंगप्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. याच प्रकरणात ईडीने कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुष्पक ग्रुपचा हा एक भाग आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत ११ फ्लॅट्स असून, हे फ्लॅट्स नीलांबरी प्रोजेक्टमधील आहेत. हा प्रोजेक्ट श्री साईबाबा गृहनिर्माण प्रा. लि.चा आहे.

राज्यात ईडीकडून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई केली जात असल्याची टीका सातत्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केली जात आहे. आज ईडीने राज्य़ाचे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने आज जप्त करत मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे ठाकरे सरकारसाठी हा एक मोठा धक्का समजला जात आहे. श्रीधर पाटणकर यांचे बँकेचे अकाऊंट आणि काही महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad