पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, निवडणूक ऑफर संपणार आहे - राहुल गांधी यांची टीका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 March 2022

पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, निवडणूक ऑफर संपणार आहे - राहुल गांधी यांची टीकानवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लवकरात लवकर आपल्या पेट्रोलच्या टाक्या भरून ठेवा. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Fill petrol tanks early, election offer is coming to an end - Criticism of Rahul Gandhi)

वाराणसी येथील पिंडरा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अजय राय च्यांच्या प्रचारादरम्यान बोलत असताना राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मते मागत आहेत. शिवाय भाजपचे लोक संपूर्ण देशात हिंदूू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे. परंतु, भाजपचे लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मते मागत आहेत.

पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचविण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी म्हणाले, मी रामायण आणि महाभारत वाचले आहे. परंतु, त्यामध्ये असे कोठेही लिहिले नाही की, काशीत शिवाच्या दरबारी येऊन खोटे बोला. येथे फक्त धर्माच्या नावावर आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं घेतली जात आहेत. लोकांच्या खात्यात १५ लाख जमा करणार, असे मी कधीच म्हणणार नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad