औद्योगिक बंदला पाठिंब्यासाठी श्रमिक जनता संघाची जनजागरण रैली ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

औद्योगिक बंदला पाठिंब्यासाठी श्रमिक जनता संघाची जनजागरण रैली !

Share This

मुंबई, दिनांक २९ मार्च -
केंद्र सरकारची धोरणे ही कामगार वर्ग व आम जनतेच्या विरोधात असल्याने त्याच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी २८ व २९ मार्च रोजी देशव्यापी औद्योगिक बंद पुकारला होता. केंद्रीय संघटनांनी पुकारलेल्या या औद्योगिक बंदला पाठिंबा देत मुंबईतील मानखुर्द मंडाला,माहुल गाव, अंधेरी, सिध्दार्थ नगर, आंबूजवाड़ी मालवणी, मालाड , अप्पापाड़ा, राविया बुधिया चाळ. मालाड पू या श्रमिक वस्त्यांमध्ये प्रचार फेरी काढून चार लेबर कोड मुळे श्रमिकांवर होणारे दुष्परिणाम बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती केली. (Janajagaran rally of Shramik Janata Sangh)

सोमवारी २८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मानखुर्द मंडाला येथून जनजागरण रैली ला सुरूवात झाली तेथून माहुल गाव, अंधेरी, सिध्दार्थ नगर, आंबूजवाड़ी मालवणी, मालाड , अप्पापाड़ा, राविया बुधिया चाळ. मालाड पूर्व या भागात संध्याकाळी ७ वाजता रैलीचा समारोप करण्यात आला. या रैलीचे नेतृत्व पूनमताई कनौजिया, गजानन तांदळे, अनवरी बहन, पूजा पंडित, आनंद भाई, जयमती भाई, श्रीकांत मोरे, शांताबाई, निर्मला, लाला काळे, शोभाताई यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी केले. जनजागरण रैली मध्ये शेकडो श्रमिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

केंद्र सरकारने ४४ कामगार कायदे संपुष्टात आणून चार लेबर कोड बनवले आहे. या चार क़ोड मुळे मालक वर्गाला कामगारांच्या शोषण करण्यासाठी खुली छूट देण्यात आली आहे. चार लेबर कोड रद्द करा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सार्वजनिक उद्योग व संपत्ती विकण्याचा सरकारी धोरणाला विरोध करण्यात आला. ठेका पध्दत बंद करा, वीज दुरूस्ती विधेयक रद्द करा, असंघटित क्षेत्रातील सर्व मजुरांना सामाजिक सुरक्षा द्या, समान कामाला समान वेतन लागू करा, महागाई कमी करा, बेरोजगार हाताला काम द्या, प्रवासी मजुरांना न्याय द्या आदी  विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

मुंबई येथे २९ मार्च रोजी सर्व कामगार संघटनानी आयोजित केलेल्या मोर्च्यात ही श्रमिक जनता संघ, माहुल समिती आणि घर बचाओ घर बना़ओ आंदोलनच्या सभासद श्रमिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन औद्योगिक बंदला पाठिंबा दिल्याची माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages