राणेंना मुंबई पालिकेच्या कारवाईपासून दिलासा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2022

राणेंना मुंबई पालिकेच्या कारवाईपासून दिलासामुंबई -  मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अधीश बंगल्याबाबत नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला होता. पण, आता हायकोर्टाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. राणेंच्या बंगल्यावर तूर्तास कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहेत.

नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू येथे अधीश नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. नारायण राणेंनी या नोटिसीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने राणेंची याचिका निकाली काढली आहे.

मुंबई पालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाईबाबत पाठवलेल्या नोटिसीवर तूर्तास कोणतीही कारवाई नको, असे निर्देश कोर्टाने मुंबई पालिकेला दिले आहेत. तसेच, निकाल नारायण राणेंच्या विरोधात गेल्यास त्यावर तीन आठवडे कारवाई करू नये आणि निकालाविरोधात कारवाई झाल्यास पुन्हा दाद मागण्याचा पर्याय राणेंकडे उपलब्ध असणार आहे. त्यामुळे राणेंच्या बंगल्यावर कारवाई तूर्तास टळली आहे. नारायण राणे यांचा जुहू येथील ‘अधीश’ बंगला वाचवण्यासाठी मुंबई महापालिकाच प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदार संतोष दौंडकर यांनी केला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad