Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ठाकरेंची माफिया सेना मुंबई लुटत आहे, माफिया सेनेला उत्तर द्यावेच लागेल - किरीट सोमय्या   मुंबई - आतापर्यंत आघडी सरकारामधील १२ जणांनी घोटाळे केले त्यापैकी २ जण जेलमध्ये गेले, इतरही लवकरच जेलमध्ये जाणार. उद्धव ठाकरेंची माफिया सेना मुंबई लुटत आहेत. त्यांना उत्तर द्यावेच लागेल असे माजी खासदार व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर ही ४ कोविड सेंटरचे काम देणं म्हणजे मानवी जिवाशी खेळणं आहे. मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने असा भ्रष्टाचार आणि जिवाशी खेळ केल्याचं म्हणत लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी विरुद्ध किरीट सोमय्या यांनी एस्प्लनेड कोर्टात तक्रार दाखल केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे सरकारमधील आणि त्यांच्या पक्षातील १२ लोकांनी घोटाळे केले आहेत. हे घोटाळे सिद्धही झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार. संजय राऊत मुख्यमंत्री उधाण ठाकरे यांनी कितीही नौटंकी केली तरी त्यांच्यावर कारवाई होणारच. उद्धव ठाकरेंची माफिया सेना मुंबई लुटत आहेत. त्यांना उत्तर द्यावेच लागेल. पाटणकर यांच्यावर कारवाई आता सुरु झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी ३ कंपन्या बनवून चतुर्वेदी यांना विकल्या आहेत. पाटणकर यांच्या कंपनीतून ठाकरे यांच्या घरी पैसे गेले हे लवकरच बाहेर येणार असे सोमय्या म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ते परदेशात मुलीला पाठवत आहेत. सामान्य नागरिकांकडे पैसे नसल्याने ते आपल्या घरच्यांना परदेशात पाठवू शकत नाहीत असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

कोविड सेंटर प्रकरणी कोर्टात तक्रार -
मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारच्या टेंडरची पारदर्शक प्रक्रिया न करता एका "फर्जी" बोगस कंपनीला मुंबईतल्या अनेक कोविड सेंटरचे कॉन्टॅक्ट दिले असा आरोप करत सुजित पाटकर यांच्या लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने आपले पार्टनरशिप रजिस्ट्रेशन २६ जून २०२० ला झाले असल्याचे भासवले पण जे पार्टनरशिप डिड आणि बाकी कागदपत्र दिले ते फर्जी होते, बोगस होते असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. एक अशी कंपनी जी रजिस्टर झालेली नाही. ज्यांच्याकडे मनुष्यबळ नाही, कार्यालय नाही, अनुभव नाही अशा बोगस कंपन्यांना कोविङ सेंटर चालवण्याचे कॉन्ट्राक्ट देणं, आयसीयु युनिटचे कॉन्ट्राक्ट देणं म्हणजे हजारो कोविड़ रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी आणि मुंबई महानगरपालिकेने केलाय असा आरोप देखील किरीट सोमय्या यांचा आहे. या कंपनीला पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने ब्लॅकलिस्ट केल्याची गोष्ट त्यांनी लपवली. आणि मुंबई महानगरपालिकेने ब्लॅकलिस्ट झाल्यानंतर ही ४ कोविड सेंटरचे काम देणं म्हणजे मानवी जिवाशी खेळणं आहे. मेडिकल इमर्जन्सीच्या नावाने असा भ्रष्टाचार आणि जिवाशी खेळ केल्याचं म्हणत लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनी विरुद्ध किरीट सोमय्या यांनी एस्प्लनेड कोर्टात तक्रार केल्याचे सांगितले. या कंपनीच्या विरोधात गुन्हा (FIR) नोंदवावा, तसेच याचा तपास करून योग्य कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश द्यावे अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे. न्यायालयाने सेक्शन ३०४-ए, ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४२५, ४६४, ४६५, ४६८, ४७० आर/डब्ल्यू सेक्शन १२०-बी आणि ३४ यांच्या अंतर्गत कारवाई करावी अशी विनंती केली असून त्याची सुनावणी पुढील आठवड्यात होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom