मुंबई - गोरेगाव येथील रामनगर परिसरातल्या शौचालयाचा काही भाग कोसळून दोनजण किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले. दरम्यान धोकादायक झालेले हे शौचालय सील करण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पोर्टेबल शौचालय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.
मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. काही ठिकाणी असुविधा व नादुरुस्त झालेली शौचालये उभी असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ५२ मधील म्हाडाच्याच्या माध्यामातून बांधण्यात आलेल्या अनेक शौचालयाची दुरावस्था झाली आहे. सातत्याने पाठपुरावा करून शौचालयाची दुरुस्ती म्हाडातर्फे करण्यात येत नसून महापालिका प्रशासन सुद्धा म्हाडाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी प्रिती सातम यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment