मुंबईसाठी पावसाळ्याचे २२ दिवस धोक्याचेमुंबई - पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती येते यावेळी समुद्रात मोठ्या लाटा उसळतात. भरतीच्या वेळी सतत पाऊस पडल्यास मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचते. तसेच भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण बुडून मृत्यूमुखी पडतात. यंदा पावसाळ्यात २२ दिवस मोठी भरती असणार आहे. यामुळे समुद्राला मोठी भरती असताना नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्रात दरदिवशी भरती आणि ओहोटी असते. पावसाळ्यात मात्र पाऊस पडताना भरती असल्यास मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा मोठ्या भरतीच्या दिवसांची यादी तयार करून त्या दिवशी महापालिकेतर्फे किनारपट्टीवर विशेष काळजी घेतली जाते. यावर्षी पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या तारखा पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या दिवशी मोठी भरती -
पालिकेने जाहीर केल्या नुसार जून महिन्यात 13 जून रोजी 4.56, 14जून रोजी 4.77, 15 जून रोजी 4.86, 16 जून रोजी 4.87, 17 जून रोजी 4.80, 18 जून रोजी 4.66 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जुलै महिन्यात 13 जुलैला 4.68, 14 जुलैला 4.82, 15 जुलैला 4.87, 16 जुलैला 4.85, 17 जुलैला 4.73, 18 जुलैला 4.51 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. ऑगस्ट महिन्यात 11 ऑगस्टला 4.59, 12 ऑगस्टला 4.77, 13 ऑगस्टला 4.85, 14 ऑगस्टला 4.81, 15 ऑगस्टला 4.66 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. सप्टेंबर महिन्यात 9 सप्टेंबरला 4.52, 10 सप्टेंबरला 4.68, 11 सप्टेंबरला 4.73, 12 सप्टेंबरला 4.65, 13 सप्टेंबरला 4.54 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

Post a Comment

0 Comments