महापालिकेतील भ्रष्टाचार मुंबईकरांसमोर आणणार - आमदार मंगलप्रभात लोढा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेतील भ्रष्टाचार मुंबईकरांसमोर आणणार - आमदार मंगलप्रभात लोढा

Share This

मुंबई - गेल्या २५ वर्षांत सत्ताधारी शिवसेनेने महानगरपालिकेत विविध मार्गांनी भ्रष्टाचार करत मुंबईकरांना लुटण्याचे काम केले आहे. मात्र, आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 'पोलखोल' अभियानाद्वारे सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे असा इशारा मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व  आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिला.  

मुंबई-गोरेगाव विधानसभेत वॉर्ड क्रमांक ५८ (प. सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११, प्रबोधन क्रीडा भवनाजवळ, तातू हॉटेलच्या बाजूला, गोरेगाव (प.) येथे शक्ति प्रदर्शन करत भाजपाने पोलखोल सभेचे रविवारी आयोजन केले होते. त्यावेळी आमदार मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पोलखोल रथाचे उद्घाटन करण्यात आले.

महानगरपालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष व आमदार अँड. आशिष शेलार म्हणाले, मुंबईकरांकडून करापोटी जमा झालेल्या पैशाची लूट करणाऱ्या सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराची 'पोलखोल' भाजपाने सुरु केली आहे. ज्या पत्रा चाळीतील मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या घरांवर सत्ताधाऱ्यांनी डल्ला मारला तिथेच पोलखोलचा नारळ आम्ही फोडला असून हा झंझावात मुंबईकरांच्या न्यायासाठी सुरु असल्याची प्रतिक्रिया आमदार शेलार यांनी दिली.

शिवसेनेनेच्या भ्रष्टाचाराची नाळ जिथे पुरली आहे, जिथून मराठी माणसाला उध्वस्त करण्यात आलं, त्या पत्राचाळीतून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला सुरुंग लावणार असा इशारा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार विद्या ठाकूर, आमदार, अमित साटम, आमदार मनीषा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर व माजी नगरसेवक संदीप पटेल यांनी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी, गोरेगावातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages