राज ठाकरेंवर कारवाई करा, मनसेवर बंदी आणा - भीम आर्मीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2022

राज ठाकरेंवर कारवाई करा, मनसेवर बंदी आणा - भीम आर्मीची मागणी


मुंबई - महाराष्ट्रसह देशात हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले गेलेले आहे. हिंदू मुस्लिम दंगली घडविण्याचे प्रणेते हे राज ठाकरे आहेत. यासाठी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांच्या भाषणावर, सभांवर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षावर बंदी आणावी. राज ठाकरे यांना महाराष्ट्रसह देशातून तडीपार करण्यात यावे अशा मागण्या भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव व गुजरात प्रभारी अशोक कांबळे यांनी केली आहे. 


याबाबत कांबळे यांनी पोलीस महासंचालक आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad