तू माझ्याशी बोलत का नाही असा जाब विचारात तरुणीवर हल्लानवी मुंबई - कॉलेजवरुन एक तरुणी घरी जात असताना ‘तू माझ्याशी बोलत का नाही’ अस म्हणत एकानं तरुणीवर हल्ला (Girl attacked in Navi Mumbai) केला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. तरुणानं एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर चाकून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नवी मुंबईमध्ये घडलेल्या या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे. 

नवी मुंबईच्या रबाळे महामार्गावर एक तरुणी कॉलेजवरुन घरी परतत होती. त्यावेळी या मुलीच्या घराजवळ राहणाऱ्या एका मुलानं तीला अडवलं. या मुलीला अडवून हल्लेखोर तरुणानं तू माझ्याशी बोलत का नाहीस?, असा जाब विचारला. एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकरणी मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या जबाबावरुन हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या हल्लाप्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर  केलं असता न्यायालयानं हल्लेखोराला  पोलीस कोठडी सुनावली आहे. 

दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नवी मुंबईतील नेरुळच्या डी. व्हाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रबाळे पोलिस या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाची अधिक चौकशी करत आहेत. क्राईम ब्रांचचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 1 तारखेला ही घटना घडली होती. 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी पीडित तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments