
मुंबई - मुंबईतील बोरिवली येथील नॅशनल पार्कमधील नदीत मित्रांसोबत पिकनिकला गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. नदीत व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच शोध मोहीम राबवण्यात आली. तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी त्या व्यक्तीला नदीच्या पाण्यातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment