मेल एक्सप्रेसच्या अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांची स्थानकांवर गर्दी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेल एक्सप्रेसच्या अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांची स्थानकांवर गर्दी

Share This

मुंबई - गडग एक्स्प्रेस आणि दादर- पुद्दुचरी एक्सप्रेस एकमेकांवर धडकल्याने दादर- पुद्दुचरी एक्सप्रेसचे 
मागील तीन डबे रुळावरून घसरले. दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान फास्ट मार्गावर हा अपघात झाल्याने मुंबईच्या लोकल सेवेवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले असून रेल्वे स्थानकात गर्दी झाली आहे. या अपघातामुळे उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडूले असून लांब पल्ल्याच्या गाड्यांना लेटमार्क लागले आहे. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 11005 दादर ते पुद्दुचरी एक्सप्रेसचे मागील 3 डबे रुळावरून घसरले आहेत. दादरहुन ही एक्स्प्रेस रवाना होताच 9.45 वाजता माटुंगा स्थानकाजवळ गडग एक्स्प्रेस आणि दादर- पुद्दुचरी एक्सप्रेसची धडक झाल्याने तीन डबे रुळावरून घसरले आहेत. मात्र या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले आहे. यामुळे जलद मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल,पोलिस आणि १०८ च्या अँबुलन्सही दाखल झाल्या आहेत. मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि रेल्वे कर्मचारी युद्धपातळीवर घसरलेले डब्बे बाजूला करण्याचं काम करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान फास्ट मार्गावर हा अपघात झाला आहे. जलद मार्गावर ही दुर्घटना झाल्यामुळे डाऊन जलद मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व फास्ट लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. या अपघातामुळे उपनगरीय लोकल सेवेचा वेळापत्रक कोलमडून पडलेली आहे याशिवाय अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागले आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व फास्ट लोकल ट्रेन स्लो मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages