पुद्दुचरी एक्सप्रेसचे 3 डब्बे घसरले, घटनास्थळी बचाव पथक दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 April 2022

पुद्दुचरी एक्सप्रेसचे 3 डब्बे घसरले, घटनास्थळी बचाव पथक दाखल


मुंबई - दादर येथून पुद्दुचरी येथे जाणाऱ्या एक्सप्रेसचे 3 डब्बे रुळावरून घसरून अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळतचा बचाव पथक आणि रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.

3 डब्बे घसरले -
दादर येथून पुद्दुचरी येथे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 11005 दादर ते पुद्दुचरी एक्सप्रेसचे मागील ३ डबे आज रुळावरून घसरले आहेत. दादर रेल्वे स्थानकातून ही एक्सप्रेस रवाना झाली होती, पुढील माटुंगा स्थानकाजवळ जाताच रात्री 9.45 वाजता हा अपघात घडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि 108 क्रमांकाच्या अँबुलन्स घटनास्थळी दाखल झाले आहे अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान डबे रुळावरून घसरले असले तरी या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळी रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad