मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत, महापालिकेचा निर्णयमुंबई - मुंबईतील सर्व शाळांचे नामलक मराठीत करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आणि अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी हा निर्णय बंधनकारक असणार आहे.

काही दिवसांपूर्वी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे नामफलक मराठीत व्हावे, अशी मागणी केली होती त्यानंतर सर्व महाविद्यालयाचे नाम फलक मराठीत करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे त्यानुसारच मुंबईतील सर्व शाळांचे नामफलक मराठीत असावे अशी ही मागणी युवासेनेने मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन केली होती, दरम्यान आज महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून मुंबई बमहानगरपालिका मान्यताप्राप्त सर्व शाळांमध्ये सुयोग्य आकाराचे नामफलक हे मराठी देवनागरी लिपीमध्ये असावेत, असे आदेश मुंबईतील अनुदानित 394, विनाअनुदानित 678 आणि अन्य खासगी बोर्डाच्या 219 शाळांना दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून हा निर्णय मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांसाठी घेण्यात आला आहे मात्र राज्य स्तरावर अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

Post a Comment

0 Comments